डोंबिवली : सध्या क्रिकेटचा वर्ल्डकप सुरु असून शनिवारी मुंबईमध्ये इंग्लड आणि दक्षिण आफ्रिका सामना झाला. सामना सुरू होण्यापूर्वी लावण्यात येणाऱ्या राष्ट्रगीता दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूसोबत उभा राहण्याचा सन्मान डोंबिवलीतील निशील शेलारला मिळाला. त्यामुळे शेलार कुटूंबियांमध्ये आंनद व्यक्त होत आहे.
मुंबईत शनिवारी यंदाच्या विश्वचषकातील गतविश्वचषक विजेते इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना खेळवण्यात आला. नेहमीप्रमाणे मॅच सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावले जाते. त्यावेळी निवडक मुलांना दोन्ही संघांच्या खेळाडूंसोबत उभे केले जाते. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान राष्ट्रगीतावेळी उभ्या असलेल्या मुलांमध्ये डोंबिवलीच्या निशील उमेश शेलारचाही समावेश होता. निशीलला दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध खेळाडू डेव्हिड मिलरसोबत उभे राहण्याचा सन्मान मिळाला. त्यामुळे शेलार कुटुंबिय आणि निशिलच्या मित्र परिवारात आनंदाचे वातावरण आहे.