डोंबिवली :​  वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक परिषदेने मानद डॉक्टरेटसाठी डोंबिवलीचे प्राणी मित्र निलेश भणगे यांचे नामांकन मंजूर केले आहे. ही प्रतिष्ठित ओळख प्राणी कल्याणासाठी उत्कृष्ट योगदानाचा दाखला आहे. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून,​ या बातमीने डोंबिवलीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.​ PAWS टीम आणि फ्रेंड सर्कल यांच्या सहकार्याशिवाय हा सन्मान मिळू श​कला नसता​ त्या सर्वांचा आभारी आहे अशी प्रतिक्रिया निलेश भणगे ​यांनी  दिली आहे.

निलेश भणगे यांनी  वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षीपासूनच ​ प्राणी कल्याणासाठी काम करायला सुरुवात केली, त्यावेळी भारतात प्राणी कल्याण चळवळ सुरू झाली होती. गेली २७ वर्षे निलेश यांनी सामाजिक कार्यात झोकून देत हे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. १९९८ मध्ये एका कबुतराची सुटका करून त्यांनी आपले काम सुरू केले आणि २०२२ मध्ये एका जार मध्ये​ एका बिबटयाचा चेहरा अडक​ला होता त्याला वाचवण्याच्या मोहिमेत​ त्यांनी धाडसाने सहभागी घेतला हेाता. 

​निलेश​ हे गेल्या ​२​७ वर्षांपासून वन्यजीव पुनर्वसनात काम करत असून साप, हरीण, कोल्हे, पक्षी, सरडे इत्यादींसह ​३​००० हून अधिक वन्यप्राण्यांना मदत करण्यात यश मिळवले आहे. ​निलेश​ यांनी  महाराष्ट्र आणि गोवा राज्यात पाळीव हत्तींवर संशोधन केले असून चार संशोधन अहवाल प्रकाशित आहेत.  त्यांच्या अहवालामुळे मुंबई, ठाणे आणि पुण्यात भीक मागण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हत्तींवर बंदी घालण्यात आली. निलेश हे स्वतः वन्यजीव छायाचित्रकार आहेत आणि ते आणि भारतातील नामांकित छायाचित्रकार विविध शाळांसाठी मोफत वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करतात. संग्रहात सुमारे ​३​०० छायाचित्रे आहेत. ​२​००४ मध्ये, नीलेशने नॅशनल सर्कसमधून ​१​२ सिंह आणि ​२ वाघांची सुटका केली आणि त्यांना बंगळुरू येथील केंद्र सरकारच्या पुनर्वसन केंद्रात पाठवले. 

​२​०१० मध्ये माजी केंद्रीय मंत्री ​ मेनका गांधी यांनी नीलेश यांना ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे पशु रुग्णालय मुरबाड येथे चालविण्याचे काम दिले, जे अजूनही अखंडपणे सुरू आहे आणि दरवर्षी हजारो प्राण्यांना वैद्यकीय सेवा आणि जीवन आधार प्रदान करते.​ नीलेश या रुग्णालयात पशुवैद्यकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम घेतात. नीलेशने यावर्षी ठाणे जिल्ह्यात ‘गॅस ऍनेस्थेसिया’ या विषयावर पहिली कार्यशाळा घेतली ज्यामध्ये २४ पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सहभाग घेतला.

​”पॉज” ​ची पहिली जखमीं प्राण्यासाठी पहिली रूग्णवाहिका 

​निलेश यांनी २००१ मध्ये​ ठाणे जिल्ह्यात प्लांट अँड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी म्हणजेच ” पॉज ” नावाची संस्था स्थापन केली. कल्याण-डोंबिवली ते बदलापूर या परिसरात पशु​, पक्षी​ यांच्यासाठी प्रथमच अशी संस्था कार्यरत होती.या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील पहिली ॲनिमल ॲम्ब्युलन्स सुरू केली आणि रस्त्यावर पडलेल्या जखमी आणि आजारी पशू-पक्ष्यांना जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्याची सोय केली. गेल्या ​२​२ वर्षांत​ निलेश यांनी  आतापर्यंत नवीन संस्थाना ​५ रुग्णवाहिका भेट दिल्या आहेत आणि संस्थेकडे सध्या वन्यजीव आणि रस्त्यावरील प्राण्यांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका आहेत. 

*पुरस्कार आणि यश:*

​२​००५ मध्ये त्यांच्या टीमच्या कामाची दखल घेत लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांच्या टीमला ‘इंडियाज यंगेस्ट ॲनिमल रिहॅबिलिटेशन टीम’ असे नाव दिले. ​निलेशला आ​तापर्यंत विविध पुरस्कार​ पटकावले आहेत आणि विशेष उल्लेख म्हणजे पेटाच्या अमेरिकेतील  इनग्रीड न्यूकर्क यांनी ​२​००७ मध्ये कोरड्या विहिरीमध्ये अडकलेल्या एका मांजरीचे पिल्लू वाचवल्याबद्दल त्यांना ​ ‘हिरो टू ॲनिमल्स’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. ​२​०१३ मध्ये इनरव्हील क्लबने ‘आऊटस्टँडिंग सर्व्हिस टू सोसायटी’ आणि​ २०१२ मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन ॲनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनने गोव्यात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत ‘स्वयंसेवक संबंध पुरस्कार’ प्रदान केला. ​२​०२२ मध्ये, निलेशला प्राणी कल्याणातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘आयकॉन्स ऑफ एशिया ऑफ अवॉर्ड’ मिळाला​ आहे.

आंतरराष्ट्रीय कार्य:

​निलेश​ यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.  आशियातील प्रमुख परिषदांमध्ये ‘स्वयंसेवक व्यवस्थापन’ आणि ‘मीडिया व्यवस्थापन’ या विषयांवर कार्यशाळा घेतात. आतापर्यंत त्यांनी सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ आणि हाँगकाँग येथे विविध वन्यजीव आणि प्राणी कल्याण परिषदांमध्ये सादरीकरण केले आहे. त्यांच्या कार्याची दखल अमेरिकन रेडिओ आणि वर्तमानपत्रे, ब्रिटनमधील वर्तमानपत्रांनीही घेतली आहे. आत्तापर्यंत ​निलेशने ​दोन हजार पेक्षा जास्त स्वयंसेवकांना वन्यजीव आणि प्राणी कल्याण मध्ये प्रशिक्षण दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!