डोंबिवली :– डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि डोंबिवली रनर ग्रुपच्यावतीने मैत्री दिनाचे औचित्य साधत डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024″ चे आयोजन करण्यात आले. डोंबिवलीत लोकप्रिय आमदार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
ही स्पर्धा 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 1.6 किमीचा फन रन अशा टप्प्यांत झाली .लहान मुलांपासून, तरुण, वृद्ध नागरिक, महिलानी , हजारो डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला अप्पा दातार चौकापासून घरडा सर्कलपर्यंत मंत्री रवींद्र चव्हाण हे स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामुळे स्पर्धकांचे मनोबल आणखीनच उंचावले.
डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024′ ने मैत्री दिनाचे खरे महत्व अधोरेखित केले. स्पर्धेच्या माध्यमातून मैत्रीचे बंध अधिक मजबूत झाले आणि एकत्रित धावण्याचा आनंद सर्वांनी अनुभवला. अशा प्रकारच्या स्पर्धा नियमितपणे आयोजित केल्या जाव्यात, अशी अपेक्षा डोंबिवलीकरांनी व्यक्त केली.