डोबिवली नगरीत साईबाबा पुण्यतिथी उत्सव !
डोंबिवली ;  श्री साई सेवा मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दि.७ ऑक्टोबर २०१९ ते दि.९ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत साईबाबा मंदिरात  श्री साईबाबा पुण्यतिथी महोत्सव शांताराम कॉलनी,भरत भोईर नगर,डोंबिवली(प) येथे साजरा केला जात आहे. यानिमित्ताने दि.७ ऑक्टोबर -सामुदायिक अखंड श्री साई चरित्र पारायण पार पडले..दि.८ ऑक्टोबर – साईपालखीची भव्य मिरवणूक (ओम साई बेन्जों बिटस्,पालगड,ता.दापोली जि.रत्नागिरी) वाजतगाजत काढण्यात येणार आहे.आणि दि.९ ऑक्टोबर – साईभंडाराचे आयोजन करण्यात आले.  मंडळाचे २१वे वर्ष असल्याने विविध सामाजिक,शैक्षणिक धार्मिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी अवि मानकर,अर्जुन आईर, समीर शिंदे,अनिल सावंत यांनी दिली.
 ———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *