एल्फिस्टन दुर्घटनेविरोधात डोंबिवलीत काळ्या फिती लावून निषेध
डोंबिवली – एल्फिस्टन येथे झालेल्या दुर्घटनेविरोधात देशभरात संताप व्यक्त होत असतानाच डोंबिवलीत काळ्या फिती लावून रेल्वे प्रशासन आणि सरकारचा मूक निषेध करण्यात आला.
कल्याण -डोंबिवलीतून मुंबईला नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखांच्या घरात आहे. रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयाचा महसूल जमा होतो मात्र त्या प्रमाणात रेल्वे प्रवाशाना सोयी सुविधा मिळत नाहीत. एल्फिस्टन दुर्घटना त्यातूनच घडली आहे त्यामुळे याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिक, पत्रकार, रेल्वे संघटनाचे पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन मूक निषेध केला. यावेळी कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे विजय राऊत, अनिकेत घमंडी , केतन बेटावदकर, प्रदिप भणगे, मयुरी चव्हाण ,रोशनी खोत,किशोर पगारे , निनाद करमकर, अतिष भोईर , विशाल वैद्य , मिथिलेश गुप्ता , के3 प्रवासी संघटनाचे पदाधिकारी , उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.