डोंबिवली : विद्येचे माहेरघर डोंबिवली, अशा डोंबिवलीने आपले वाचन प्रेम जोपासले आहे, आज ही येथे प्रमुख ठिकाणी पुस्तकांची सार्वजनिक ग्रंथालये आढळून येतात, त्यातील डोंबिवलीकरांच्या पसंतीचे आणि साऱ्या महाराष्ट्राला देखील आपली वाचनाची आवड जोपासायला लावणारे ग्रंथालय ज्याची नोंद रेकॉर्ड बुक मध्ये आहे असे पै फ्रेंड्स लायब्ररी, ह्याच पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि वाचक प्रेमी डोंबिवलीत साजेसे असे विविध उपक्रम राबविले जातात त्यातील एक उपक्रम म्हणजे “पुस्तक अदान प्रदान” भव्य असा उपक्रम !
यंदाच्या म्हणजेच येणाऱ्या नव्या वर्ष्यात १९ जानेवारी रोजी या उपक्रमाला डोंबिवलीच्या संत श्री सावळाराम महाराज क्रिडासंकुलात भव्य व नेहमीच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने पार पडणार असून याचे मुख्य आकर्षण असणार ते म्हणजे आपली हिंदू अस्मिता असलेले अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराची भव्य अशी ५०,००० पुस्तकातून घडणारी प्रतिकृती. अयोध्या येथील श्री राम मंदिराचा जीर्णोधार २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. आणि डोंबिवलीतील पुस्तक रूपी श्री राम मंदिराचे प्रदर्शन हे १९ जानेवारी रोजी होणार आहे.
या उपक्रमासाठी डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे प्रमुख सहकार्य असणार आहे आणि पुस्तकांच्या राम मंदिर उभारणीला प्रारंभ झालेला असून नुकतीच त्याची पाहणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे ह्यांनी पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै यांचे सोबत केली. या आगळ्या वेगळ्या आणि डोंबिवलीकरांना अभिमान वाटेल अश्या ह्या उपक्रमास खासदार डॉ श्रीकांत शिंदे ह्यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, आम्ही डोंबिवलीकर हे देखील ह्या उपक्रमास मोलाचे सहकार्य करत आहे, जानेवारी महिन्यात संपूर्ण देशात प्रभू श्री रामचंद्राचा डंका वाजेलच पण त्याच बरोबर पुस्तक अदान प्रदान उपक्रमातील पुस्तक रुपी श्री राम मंदिरामुळे समस्त डोंबिवलीतील वातावरण ही रामलल्लाच्या भक्तीत अखंड बुडून जाईल.