डोंबिवलीत वाहतूक व्यवस्थेचे वाजले की बारा…इंदिरा चौकात बिनधास्तपणे केली जातेय रिक्षा पार्किंग

डोंबिवली वाहतूक पोलिसांचे रिक्षाचालकांना अभय ?

डोंबिवली :- ( शंकर जाधव ) : शहरात चौकाचौकात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले रिक्षा स्टॅन्ड, इंदिरा चौकात मनमानीपणे केली जात असलेली रिक्षा पार्किंग, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि रिक्षा चालकांचा बेशिस्त आणि मनमानी कारभाराकडे वाहतूक पोलीस यंत्रणेने केलेला कानाडोळा या सगळया प्रकारामुळे डोंबिवलीत वाहतूक व्यवस्थेचे बारा वाजलेत. वाहतूक कोंडीतून कसाबसा मार्ग काढीत डोंबिवलीकर चाकरमण्यांना घर गाठावे लागत आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय.
स्मार्ट सिटीमध्ये वाहतूक व्यवस्थेला महत्व दिले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला स्मार्ट सिटीच्या यादीत पहिल्या ५० क्रमाकांच्या यादीत नावे यावेत यासाठी दिखाव्याची कामे सुरु आहेत. मात्र वाहतूक व्यवस्थेचे डोंबिवलीत बारा वाजले असल्याचे दिसून येतेय. मात्र याकडे वाहतूक पोलीस यंत्रणा, रिक्षा युनियन , राजकीय नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी यांनी डोळयावर पट्टी बांधल्याचे दिसून येते.

इंदिरा चौक हा शहरातील महत्वाचा परिसर आहे. पुलाखालीच रिक्षाचालकांनी रिक्षा पार्किंग करण्यास सुरुवात केलीय. या पार्किंगमुळे इतर वाहन चालकांना व पादचा-यांना मोठया प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक पोलिसांच्या डोळया देखत हा प्रकार सुरू असताना या प्रकाराकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस हे वर्षातून एकदाच इंदिरा चौकात कारवाई करतात. आता वाहतूक पोलीसांकडूनच रिक्षाचालकांना अभय मिळत असल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढलीय. त्याचा अनुभव वारंवार प्रवाशांना सहन करावा लागतो.

अनधिकृत रिक्षा स्टॅन्डची समस्या
अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड वाढल्याने याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. मात्र अनधिकृत रिक्षा थांबे कुठे असावेत ? किती असावे ? याकडे मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागांचे अधिका- यांनी पाठ फिरवलीय. इंदिरा चौकात रिक्षा चालकांनी अनधिकृत रिक्षा थांबे बनले असून रिक्षा पार्किंग होत आहे. एकीकडे वाहतूक पोलीस संख्या कमी असल्याची सबब वाहतूक शाखाचे पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे यांनी पुढे केली आहे. प्रत्यक्षात इंदिरा चौकात एकाच ठिकाणी पाच – ते सहा वाहतूक पोलीस कारवाईसाठी उभे असताना दिसतात. रिक्षाचालकांवर कारवाई करण्याऐवजी दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात वाहतूक पोलीस दंग असतात. सहाय्यक पोलीस आयुक्त आव्हाड यांनीही डोंबिवलीतील वाहतूक पोलिसांच्या या कामाचा जाब विचारला नाही. इंदिरा चौकात रिक्षाचालकांना मिळत असलेले वाहतूक पोलिसांकडून अभय वाहतूक पोलिसांच्या कामांचे उदाहरण आहे.

मुजेार रिक्षाचालकावर कारवाई करा
इंदिरा चौकात रिक्षा पार्किंग होत असताना वाहतूक पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतात. याबाबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे ( पर्यावरण विभाग ) उपाध्यक्ष हर्षद पुरोहित यांनी सांगितले की, रिक्षा युनियन या विविध राजकीय पक्षांच्या हाताखाली आहेत. आणि अनेक रिक्षाचालक या युनियनचे सदस्य असल्याने यांचा राजकीय पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे रिक्षाचालक मनमानी करत असतात. वाहतूक पोलिसांनी मुजोर रिक्षा चालकांवर कडक कारवाई केली पाहिजे. राष्ट्रवादीचे कल्याण –डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष विनया पाटील म्हणाल्या की, सर्व रिक्षाचालक बेशिस्त किंवा मुजोर नाहीत. मात्र जे वाहतूकीच्या नियमांचे पालन करत नाही त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. इंदिरा चौकात रिक्षा पार्किंग करणाऱ्या रिक्शाचालकांवर वाहतूक पोलीस का कारवाई करत नाही असा प्रश्न उपस्थित होतो.

पनवेल बसथांब्यासमोर अनधिकृत रिक्षा थांबा ..
पवनेल बसथांब्यासमोर अनके वर्षापासून रिक्षाचालकांनी अनधिकृत रिक्षा थांबा बनविला आहे. त्यामुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासामुळे अनके वेळेला येथील रिक्षाचालक आणि प्रवाशी यांच्यात वाद होत असतो. मात्र वाहतूक पोलीस तया ठिकाणी उभे राहून हा प्रकार पहात असतात मात्र रिक्षा चालकांवर कोणतीही कारवाई करीत नाहीत.

गोविंद गंभिरे यांच्या बदलीची मागणी …
शहरात रिक्षा चालकांचा मनमानी कारभार सुरू आहे. प्रवाशांशी हुज्जत घालणे, भाडे नाकारणे असे प्रकार वारंवार घडत असतानाही वाहतूक पेालीस निरीक्षक गोविंद गंभिरे यांच्याकडून रिक्षा चालकांच्या या कोणतीच दखल घेतली जात नाही. तसेच शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यास वाहतूक पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे कमी पडत असल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिसांच्या कारवाईला मुजोर रिक्षाचालक भीत नसल्याने गंभिरे यांची बदली करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
़़़़

2 thoughts on “डोंबिवलीत वाहतूक व्यवस्थेचे वाजले की बारा…इंदिरा चौकात बिनधास्तपणे केली जातेय रिक्षा पार्किंग : डोंबिवली वाहतूक पोलिसांचे रिक्षाचालकांना अभय ?”
  1. Auto rikami firavtat but Bhada nai ghet…. Akkhya MUMBAI madhye fakt ani fakt aamchya Dombivali madhil rikshawale khup mhanje khup beshistha ani uddhatt aahet… Khup dadagiri karat Manmani karatat….. Daru piun chalvta Riksha…..eka rikshat 4/5pravasi jabardasti basavtat… Kashi hi chalavtat Riksha…. Kuthehi park kartat… Full on Dadagiri Auto valyanchi.. Koni nai Kai karatach Naina…. 😈😈

  2. Auto valyan mule trrafik hote ani padchari rastya var hatgadi laun dhande karun yenarya janaryana traas hot nahi Ka ….. Tyanchya var Kon action ghenar … Kon ny ghenar Karan tyanchya kadun hafte miltat na…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *