मनसे पाठोपाठ सेनेची वीज कार्यालयावर धडक
डोंबिवली : वीजभारनियमनाविरोधात मनसेने गांधीगिरी स्टाइलने आंदोलन केले असतानाच शनिवारी शिवसेनाही आक्रमक झाली.वीज कारभाराच्या भोंगळ कारभाराविरोधात सेनेने मोर्चा काढून वीज अधिकाऱ्यांना मीटर भेट देत निषेध केला.

शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला, यावेळी केडीएमसीचे सभागृह नेते राजेश मोरे , नगरसेवक दीपेश म्हात्रे,केडीएमटी सदस्य् संतोष चव्हाण ,महिला शहर संघटक कविता गावंड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अवाच्यासव्वा बिल आकारणी करणे, रिडींग वेळेत न घेणे, ग्राहकाला न सांगता फॉलटी मीटर काढणे हे प्रकार सर्रासपणे होत असल्याचे शहर प्रमुख चौधरी यांनी सांगितले. महावितरणच्या कारभाराच्या कारभाराचा निषेध म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश कलढोणे याना मीटर भेट दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!