अंकुश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने
रिपाइंच्या डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची प्रमुख उपस्थिती
डोंबिवली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार दि १२ फेब्रुवारी रोजी डोंबिवली मुख्य कार्यालयाचे उद्घाटन सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी रिपाइंच्या महिला प्रमुख सीमा आठवले, बाल आघाडी प्रमुख जीत आठवले तर मार्गदर्शक कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्यासह प्रमुख पाहूणे म्हणून ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री व राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, केडीएमसीच्या महापौर विनिता राणे, रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश सावंत, प्रदेश उपाध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे प्रदेश, उपाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. डोंबिवली पूर्वेतील रामनगर परिसरातील शिवांजली धाम येथे रिपाइंचे डोंबिवली शहर मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अत्यंत आकर्षक व कार्पोरेट लूट असणारे रिपाइंचे हे एकमेव कार्यालय आहे. डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आलं आहे. यावेळी युवा गायक संतोष जोंधळे यांच्या बुध्द व भीम गीतांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे.
—————