डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी
डोंबिवली रिपाइंचा आंदोलनाचा इशारा 
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विभागीय कार्यालयाजवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याबाबतचा ठराव महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते झाला आहे मात्र अजूनही महापालकेकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी केडीएमसी आयुक्त पी वेलारासू यांना दिलेल्या निवेनात दिला आहे.
डोंबिवली विभागीय कार्यालया शेजारीच पुर्णाकृती पुतळयासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेत ठराव मंजूर होऊन जागाही निश्चित केली असताना महापालिका प्रशासनाकडून दिरंगाई का केली जात आहे असाही सवाल गायकवाड यांनी उपस्थित करून तात्काळ निर्णय घेण्यात यावा. यावेळी शहर अध्यक्ष गायकवाड यांच्यासोबत कार्याध्यक्ष किशोर मगरे सरचिटणीस दिनेश साळवे उपाध्यक्ष वसंत टेकाळे दिलीप काकडे युवक अध्यख सतीश पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *