डोंबिवलीत रिपाइंतर्फे ५ सप्टेंबरला भाऊबीज
आणि बेरोजगार मेळाव्याचे आयोजन
डोंबिवली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्यावतीने डोंबिवलीत ५ नोव्हेंबरला रोजी संध्याकाळी ५ वाजता, सर्वेश हॉल डोंबिवली (पूर्व) येथे बेरोजगार मेळावा आणि आगळी वेगळी भाऊबीजचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सीमाताई रामदास आठवले या उपस्थित राहणार आहेत. यावेळी गोरगरीब एक हजार महिलांना भाऊबीज म्हणून मोफत साड्या भेट देण्यात येणार आहेत.
रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रिपाइंचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बेरोजगार मेळावा होणार असून, यावेळी महात्मा फुले महामंडळाचे व अण्णा भाऊ साठे मंडळाचे तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून, मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती रिपाइंचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी दिली