राजस्तरीय गुलाब प्रदर्शनाला डोंबिवलीकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद ; राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची संकल्पना !
डोंबिवली : विविध रंगाच्या, विविध आकाराच्या, रंगछटा असलेल्या मनमोहक गुलाबांसोबत सेल्फी काढताना गुलाबप्रेमी हुरळून गेले होते. कोणी गुलाबांसोबत सेल्फी काढत होते, तर कुणी मनमोहक गुलाबांना आपल्याकॅमेऱ्यात बंदिस्त करीत होते. निमित्त होते ते डोंबिवलीत भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शनाचे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आनंद बालभवन, रामनगर येथे तीन दिवसीय गुलाब प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांमध्ये गुलाबांचा प्रसार व्हावा तर लोकांना वाटते की कुंडीत लावलेल्या गुलाबाला एक-दोन फुले आल्यावर झाडे मरते. पण त्यांची निगा कशी राखावी हे त्यांना समजावे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
४ हजारांहून अधिक गुलाब
या प्रदर्शनात ३५० प्रकारची ४ हजारांहून अधिक गुलाब मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये मिनीएचर प्रकारातील गोल्डन कॉईन, पिवळा मिनीएचर, रोझ मरीन, चारिश्मा, दुरंगीमधील रांगोली, रोनॉल्ड रिक्शन रोझ, लुईस एटीस,फॉकलोर, कॉलिफोनिया ड्रिमिंग, ड्रिमकम्स,फ्लोरिबंडा या प्रकारातील जांभळा मिनीएचर,अॅक्रोपॉली, शिवाऊ मॅक्वीन, केशरी या प्रकारातील कॅराबियन, कॅरीग्रट, लव्हर्स मिडींग, टच आॅफ क्लास, स्पाईस कॉफी, सुगंधी प्रकारात दम कार्डनी रोझ, द मकाठनी रोझ,जांभळा या प्रकारातील व्ह्यू ओसियन, सुधांशू,रेघांचा स्टिलभीफिस, रॉफ अॅण्ड रोल, ज्युलियो इगलिक्सिस, जर्दाळू गुलाब, अशी अनेक फुलांचा यात समावेश आहे. तसेच प्रत्येक फुलाची माहिती देण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक संदीप पुराणिक, विशु पेडणेकर, राजन आभाळे, निलेश म्हात्रे तसेच भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते सुरेश पुराणिक, भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष संजीव बिडवाडकर,भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे आदींसह अनेक कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. ( श्रुती देशपांडे- नानल, प्रतिनिधी)
***