डोंबिवलीत लोकलमधील  गर्दीचा आणखी एक बळी
डोंबिवली :-  ( शंकर जाधव ) : लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका तरुणांचा बळी गेलाय. रजनीश प्रमोद सिंग ( वय ३० ) असे त्या तरुणाचे नाव आहे. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान तो लोकलमधून खाली पडला. यापूर्वी भावेश नकाते आणि धनश्री गोडवे हे दोघे लोकलच्या गर्दीचे बळी ठरले असतानाच, राजनिशच्या मृत्यूने  पुन्हा डोंबिवली हळहळली आहे.
 रजनीश प्रमोद सिंग हा डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथील सलाका अपार्टमेंट मध्ये राहत होता. परेल येथील सुझूकी मोटर कंपनीत तो व्यवस्थापक म्हणून काम करत होता. कल्याण- सीएसटी लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात ८. ४० मिनिटांनी आली. त्या लोकलमध्ये रजनीश चदला.लोकलमध्ये खूप गर्दी असल्याने रजनीशला आत शिरता आले नाही. त्यामुळे लोकलच्या दरवाज्याला लटकून त्याला प्रवास करावा लागला. मात्र डोंबिवली – कोपर रेल्वे स्थानकादरम्यान रजनीश लोकलमधून खाली पडल्याचे समजताच लोकलमधील प्रवाशांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना कळविले. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात रजनीशच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!