डोंबिवलीत पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबीर

डोंबिवली : दहा-बारा तास चालणारी ड्युटी, जेवणाच्या अनिश्चित वेळा, बाहेरचं खाण, अपुरी झोप यामुळे पोलिसांच्या आरोग्याचे तीनतेरा वाजतात. पण पोलिसांचे आरोग्य जपण्यासाठी व्यायाम परीक्षक व आहार तज्ञ राहुल चौधरी आणि रिद्धी देढीया हे तरुण पुढे सरसावले आहेत. परसोना याच्या वतीने विष्णुनगर पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी २७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलंय. शिबिरात प्राणायाम, व्यायाम ताणतणाव तसेच आहार या विषयी मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच व्यायामाचे प्रकार करून घेतले जाणार आहे अशी माहिती राहुल चौधरी यांनी दिली.

One thought on “डोंबिवलीत पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबीर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!