डोंबिवली: डोंबिवलीत अमली पदार्थ विक्रीकरण्यासाठी आलेल्या साहिल बोराडे आणि प्रकाश जाधव या दोन
जणांना डोंबिवली पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे.त्यांच्याकडून २ किलो ६३८ किलो ग्राम वजनाचा गांजा डोंबिवली पोलिसांनी हस्तगत केला.

शरीरासाठी घातक असलेल्या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी दोन इसम डोंबिवली पूर्वेत येणार असल्याची गुप्त माहिती डोंबिवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल वाघ यांना मिळाली असता त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक अच्युत मुपडे, पोलीस उपनिरीक्षक केशव हासगुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करत नेहरू रोड याठिकाणी सापळा रचत साहिल बोराडे आणि प्रकाश जाधव यांना गांजा सहित अटक केली असून त्यांच्याकडून २ किलो ६३८ किलो ग्राम वजनाचा गांजा असा २५०० हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.या दोन्ही आरोपीना न्यायालयात हजर केले असता २० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *