केडीएमटीची डोंबिवली- पनवेल बससेवा पून्हा सुरू
डोंबिवली – शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परिवहन समितीचे सभापती संजय पावशे आणि परिवहन सदस्यांच्या पुढाकाराने गेल्या दोन वर्षापासून बंद असलेली केडीएमटीची डोंबिवली पनवेल बससेवा आजपासून पून्हा सुरू करण्यात आलीय. डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकातून ही सेवा सुरु करण्यात आलीय. परिवहन सेवा सुरू झाल्याने पनवेलकडे जाणा- या प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय.
अशी असेल बसची वेळ
डोंबिवली-पनवेल रेल्वे स्थानक सकाळी ८ , ९ , ११.३० , दुपारी १२.३५, सायंकाळी ४. २०, ५.२० आणि रात्री ८. ५५ मिनिटांनी तर पनवेल-डोंबिवली रेल्वे स्थानक सकाळी ९.३५ , १०.३५ दुपारी १.१० , २.१० , सांयकाळी ४.५५, ६.५५ रात्री ९.३० आणि १०.३० मिनिटांनी अशी वेळ आहे.
हा असेल मार्ग
बस सेवेचे ३५ रुपये भाडे आहे. डोंबिवली स्टेशन –चार रस्ता ,गावदेवी मंदिर , शिवाजी उद्योग , स्टार कॉलनी , सागाव , पिंपळेश्वर मंदिर , पाईपलाईन, काटई, लोढा, देसाई , म्हात्रेवाडी , उत्तरशिव फाटा, दहिसर मोरी, तळोजा रेल्वे स्थानक , नावडे फाटा , कळंबोली कॉलीनी,आसूड गाव त्यानंतर पनवेल रेल्वे स्थानक असी मार्गिका आहे.