नागुबाई इमारतीतील बेघर ७२ कुटूंबियांंना अखेर बीएसयुपीतील घरात तात्पुरती निवा-याची सोय 
 पालकमंत्रयाच्या हस्ते रहिवाशांना घरांच्या चाव्या वाटप  
डोंबिवली (आकाश गायकवाड)  : पश्चिमेतील नागुबाई इमारतीला तड़े गेल्याने महापालिकेने त्या इमारतीतील ७२ कुटुंबियांना घराबाहेर काढून ती धोकादायक इमारत पाडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु  केले आहे.मात्र रातोरात उघड़यावर पडलेल्या त्या बेघर कुटुंबियांच्या मदतीसाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर राजेंद्र देवळकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनीधी धावून  आले आणि त्यांनी त्यांच्या निवाऱ्याची सोय केली आहे. महापालिकेच्या कल्याण जवळील कचोरे येथील बीएसयुपी प्रकल्पातील इमारतीमधील घरांमध्ये त्यांची तात्पुरती निवा- याची सोय केली. त्या घरांच्या चाव्या पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते देण्यात आल्या.
गुरुवारी रात्री पश्चिमेतील धोकादायक नागुबाई इमारतीला तडे गेल्याने बेघर झालेल्या ७२ कुटुंबीय  निवाऱ्याच्या शोधात होती. मात्र त्यांच्या निवाऱ्याची सोय करून देऊ असे आश्वासन विविध पक्षातिल लोकप्रतिनिधिसह सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाश्याना दिले होते.त्यानुसार शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर शासनाच्या नगरविकास विभागाने पालिका आयुक्तांना पत्र पाठवुन राज्य शासनाने बीएसयुपी प्रकल्पातील घरे नागुबाई वासियांसाठी १९० दिवसांसाठी  तात्पुरते स्वरूपात वापर करण्यास परवानगी दिली आहे.     बुधवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कुटुंबियांना कल्याण जवळील कचोरे येथील बीएसयुपी प्रकल्पातील इमारतीत  घरांच्या चाव्या दिल्या. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर , माजी महापौर रमेश जाधव , शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे ,  युवा पदाधिकारी दीपेश म्हात्रे , भाजप नगरसेविका मनीषा धात्रक , रेखा चौधरी , रिपाईचे  माणिक उघडे , मीना साळवे , राहुल क्षीरसागर , परिवहन समिती सभापती संजय पावशे , सदस्य मनोज चौधरी यासह  अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याप्रकरणी युवा सेनेचे राहुल लोंढे यांनी महत्वाची भूमिका बजावली. यावेळी शारदाबाई पवार याना घराची चावी दिल्यानंतर उर्वरित रहिवाश्याना चिठ्या टाकून घरांची नंबर काढण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे  म्हणाले की ,  शिवसेना या कुटुंबियाचा संसार उघड्यावर पडू देणार नाही. त्यांच्या कुटुंबीवर आलेल्या संकटावर सर्वानी मिळून सामना करावा  लागेल. आज सकाळी कॅबिनेटच्या बैठकीत मी मुख्यमंत्र्यांना  या घटनेने गांभीर्य पटवून दिले. त्यावेळी  त्यांनीही ७२ कुटुंबियांना  निवारा देण्याचे निर्देश दिले आहे.  त्याबद्दल  मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो.  बीएसयुपी  प्रकल्पात  अश्या प्रकाराच्या धोकादायक इमारती लोकांना निवाऱ्यासाठी शासनाकडून परवानगी मिळाली पाहिजे. ठाण्याच्या धर्तीवर कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत क्लस्टर  योजना  राबविल्यानंतर धोकादायक इमारतीतील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *