जय मल्हारचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

डोंबिवलीत दौडमध्ये धावले हजारो विद्यार्थी ..

डोंबिवली ( प्रतिनिधी) : डोंबिवलीत जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रविवारी रस्ता सुरक्षा अभियान निमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये जवळपास 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये काही मतिमंद विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

यावेळी आमदार रविंद्र चव्हाण, शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी स्पर्धकांना हिरवा कंदील दाखवला. सकाळी 7 वाजता एमआयडीसी निवासी विभागातील महावितरण कार्यालयासमोरून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. आमदार रविंद्र चव्हाण, शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, नगरसेविका डॉ. सुनीता पाटील नगरसेविका, मनसेचे डोंबिवली शहर संघटक हरिष पाटील, कल्याण आरटीओ अधिकारी काझी, इंगळे, आरएसपीचे क्षीरसागर, शिंपी, सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी काझी यांनी उपस्थित सर्व वाहतूक करणाऱ्या चालकांसह विद्यार्थी व पालकांना वाहतूक नियमाचे कसे पालन करावे, याबद्दल मार्गदर्शन केले. अध्यक्ष सुदाम जाधव यांच्यासह राजेश जयस्वाल, बाळू घरत, वैभव तुपे, लक्ष्मण फडतरे, कांशीराम साळवी, श्रीकांत चतुर, दीपक वारंग, शरद पाटील, सचिन मोरे, तानाजी आहेर, राजेंद्र धारावणे, संतोष कदम, विनोद जयस्वाल, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दौड यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेत यशस्वी झालेल्या आणि सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. दौडचे संपूर्ण सूत्रसंचालन शिवाजीराव पाटील यांनी केले होते.

****
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!