डोंबिवली क्रीडासंकुलात कच-याचे साम्राज्य, मनविसेचे अनोखे आंदोलन : प्रभाग क्षेत्र अधिका-याच्या कार्यालयाबाहेरमैदानी खेळ खेळून केला निषेध

डोंबिवली (शंकर जाधव)  : शहरात एकमेव असलेल्या क्रिडासंकुलात लग्न सोहळयांचे कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी मैदानात जमलेला कचरा उचलला जात नाही. त्यामुळे डोंबिवलीकरांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर दुर्लक्ष केले जात असल्याने या निषेधार्थ मनविसेने आज डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर मैदानी खेळ खेळून अनोखे आंदोलन करीत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.

 

डोंबिवलीतील क्रीडा संकुलात लग्न सोहळे पार पडल्यावर दुसर्या दिवशी तेथेचे कचरा पडल्याने नागरीक हैराण झाले आहेत. मनविसेचे डोंबिवली शहराध्यक्ष सागर जेधे यांच्याकडे यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यावर त्यांनी पालिका प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केले. मात्र त्यावर पालिकेने फारसे लक्ष दिले नसल्याने अखेर सोमवारी अध्यक्ष सागर जेधे, सचिव प्रीतेश पाटील यासह सचिन कस्तूर , अमित बगाटे, कौस्तुभ फडके , सुहास काळे , गणेश नवले, अनिश निकम, स्वप्नील वाणी, क्षितीज माळवदकर , ज्ञानेश महाडिक, चिन्मय वारंगे , नंदादीप कांबळे , योगेश चौधरी, जयेश सकपाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनविसेचे निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याच्याकार्यालयाबाहेर मैदानीखेळ खेळून आंदोलन केले. काही वेळानंतर साबळे यांनी त्याचे निवेदन घेऊन मैदानातील कचरा लवकरात लवकर उचलू असे आश्वासन दिले. रस्त्यावर खड्डे पडल्याने उलटे चालणे, पालिकेच्या कार्यालयासमोर गणपती आरती केली, प्रशासनाचे श्राद्ध घातले, विभागीय कार्यालयात उपायुक्त बसत नसल्याने खडी टाकली अश्या प्रकारची अनेक आंदोलने करून महराष्ट्र नवनिर्माण सेनेने जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे हे आंदोलनही अनोखे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!