मनसेच्या आंदोलनाने एमआयडीसीला जाग : अभिनव विद्यालयाचा रस्ता महिनाभरात पूर्ण करणार !
डोंबिवली :   एम आय डी सी निवासी विभागातील अंतर्गत रस्ते आणि अभिनव शाळेजवळील रस्त्याचे काम पावसाळ्या अगोदर पूर्ण करावे या मागणीसाठी आज मनसेने एम आय डी सी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मनसेने प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक आदी पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. गेल्या अनेक महिन्यापासून या रस्त्याची दुरावस्था असल्याने वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. मनसेच्या दणक्याने एमआयडीसी जागी झालीय. मनसेच्या आंदोलनाची दखल घेत अवघ्या काही तासात एमआयडीसी अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या मोजणीच्या कामास सुरुवात केली.महिनाभरात हे काम पूर्ण करणार आल्याचे लेखी आश्वासन एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांनी दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *