डोंबिवलीतील मिलापनगर परिसर हिरवागार होणार !

डोंबिवली :  एमआयडीसी मधील इवोनिक कॅटलिस्टस इंडीया प्रा.ली.(जर्मन कंपनी) यांनी मिलापनगर सर्व्हिस रोडवरील हाय टेन्शन खलील भूखंडाचा (ग्रीनबेल्ट) काही भाग दत्तक घेतला असून मिलापनगर रेसिडेंटस वेलफेअर असोसिएशनचा सहकार्याने तेथे फुलझाडे/वृक्ष लावून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. इवोनिक कॅटलिस्टस कंपनीने याची यापुढे सर्व देखभाल करण्याची जबाबदारी उचलली आहे. वृक्षारोपण प्रसंगी कंपनीचे जर्मन स्थित मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर थॉमस टाके, जनरल मॅनेजर श्री मुरली अय्यर, डेप्युटी मॅनेजर सुनील शृंगारे, मिलापनगर रेसी.वेलफेअर असो. चे अध्यक्ष मनोहर चोळकर, सहसचिव अरविंद टिकेकर,माजी अध्यक्ष श्रीमती वर्षा महाडिक, राजू नलावडे इत्यादी उपस्थित होते.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *