डोंबिवली, दि,12 : डोंबिवलीतील एमआयडीसीमधील फेज २ मधील इंडो अमाईन्स कंपनीत आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. यावेळी अनेक स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. कंपनीत अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट झाली आहे. आग लागण्याचं नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही. या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झाले आहे.
स्फोट ज्याठिकाणी झाला त्याच ठिकाणी एक शाळा आहे. माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे. केमिकल कंपनी असल्याने आणखी स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसर रिकामा करण्यात आला आहे. कंपनीच्या जवळ असलेल्या गाड्या इतर बांधकामे जळून खाक झाली आहेत.स्फोट ज्याठिकाणी झाला त्याच ठिकाणी अभिनव विद्यालय शाळा आहे. शाळा व्यवस्थापनाने शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे. केमिकल कंपनी असल्याने आणखी स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसर रिकामा करण्यात आला आहे. कंपनीच्या जवळ असलेल्या गाड्या इतर साहित्य जळून खाक झाली आहेत.डोंबिवली एमआयडीसीमध्ये काही दिवसांपूर्वी अमुदान कंपनीमध्ये मोठा स्फोट होऊन १७ जणांना जीव गमवावा लागला होता अनेक तर अनेक जण जखमी झाले होते.तेव्हा स्फोटानंतर सरकारने धोकादायक कंपन्या स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय धोकादायक कंपन्या बंद केल्या आहेत अशी माहिती दिली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या आजूबाजूची घरे रिकामे केले जात आहेत. किती लोक नेमके आत अडकले आहेत, याची अद्याप माहिती मिळालेली नाही.