जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेचा ९ वा वर्धापनदिन आणि पोलीस रेझिंग डे संपन्न
डोंबिवली : जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्या ९ व्या वर्धापन व पोलीस रेझिंग डे दिनानिमित्त रविवारी डोंबिवलीत भव्य मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गतिमान विद्यार्थ्यांचा सहभाग मॅरेथॉनचे प्रमुख आकर्षण ठरले.
तिसरी ते बारावीच्या विद्यार्थींमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. पहिला गट तिसरी चौथी २ किमी, दुसरा गट पाचवी आणि सहावी ३ किमी, सातवी आणि आठवी ४ किमी., चौथा गट नववी ते दहावी ५ किमी., पाचवा गट अकरावी ते बारावी ६ किमी. अशा चार गटात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धमध्ये ११३७ विद्यार्थी सहभाग घेतला. गतिमंद विद्याथ्र्यांनी सहभाग घेतल्याने या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले.
या प्रसंगी शिवसेना ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील कल्याण ग्रामीण जिल्हा सरचिटणीस नंदु परब युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य अभिजीत भाऊसाहेब चौधरी, डॉ सुनिता ताई पाटील उपस्थित होते तसेच संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव, कार्याध्यक्ष दीपक वारंग, सचिव राजेश जयस्वाल, खजिनदार लक्ष्मण फडतरे , उपाध्यक्ष राजेंद्र धारवणे, बाळु घरत, संतोष कदम ,तानाजी आहेर, अनिल शिंदे, राजेंद्र पाटील आनंद लाड आदी कार्यकत्यांचे मोलाचे योगदान लाभले.