डोंबिवली: डोंबिवलीचे दै. सामनाचे पत्रकार आकाश गायकवाड यांचे वडील कृष्णा गायकवाड यांचे शुक्रवारी रात्री राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
डोंबिवली पश्चिमेतील गायकवाडवाडी येथे ते राहत होते. रेल्वेत नोकरी केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. गेले अनेक दिवसापासून ते आजारी होते. शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्ययात्रेत राजकीय, सामजिक पत्रकार क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार पार पडले.
*******