मनसेच्या इशा-यानंतर डोंबिवली क्रिडासंकूल झालं चकाचक 

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेने हभप सावळाराम महाराज क्रिडासंकुलातील कचरा जेसीबीच्या साहययाने  तातडीने उचलल्याने   क्रिडासंकूल चकाचक झालय. २४ तासात कचरा न उचलल्यास महापौर आणि आयुक्तांना सप्रेम भेट देण्याचा इशारा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली.  डोंबिवली क्रिडासंकूल चकाचक झाल्याने कदम यांनीही पालिका प्रशासनाचे आभार मानीत, मैदानाची अशीच स्वच्छता राखावी अशी अपेक्षा व्यक्त केलीय.  दोन दिवसांपूर्वीच याठिकाणी एक कार्यक्रम पार पडला होता. त्या कार्यक्रमाचा कचरा-अन्नपदार्थ सर्व मैदानभर पसरला होता. त्यामुळे सर्वत्रच दुर्गंधी पसरली होती क्रिडासंकुलात व्यायामाला,फिरायला व खेळायला येणाऱ्या नागरीकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागले होतेे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!