डोंबिवलीत खड्डे भरण्याच्या कामात थूकपट्टी
माजी विरोधी पक्षनेत्यांची चौकशीची मागणी
डोंबिवली : शहरात रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत. मात्र रस्त्यावरील माती व्यवस्थित साफ न करताच खड्डे भरले जात आहे. थुकपट्टी लावून ही कामे केली जात असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते व काँग्रेस चे स्थानिक नेते रमेश म्हात्रे यांनी केलाय. त्यामुळे वेळीच या कामांकडे लक्ष द्यावे अशी मागणी ही म्हात्रे यांनी केलीय.
डोंबिवली पश्चिमेत राणा प्रताप शाळा आणि जोंधळे हायस्कूल रोड येथील रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत. मात्र रस्त्यावरील खड्डयातील माती व्यवस्थितपणे साफ न करता वरचेवर खड्डे भरले जात आहेत. खड्डे भरताना मी स्वतः हजर असताना हे निदर्शनात आले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. तसेच खड्डे भरण्याची कामे सुरू असताना त्याठिकाणी महापालिकेचा कोणताच अधिकारी हजर नव्हता. ठेकेदार मनमानी प्रमाणे काम करताना दिसून आले. आताच खड्डे भरण्याची कामे व्यवस्थित न झाल्यास, डोंबिवलीकराना पुन्हा त्याच समस्येला सामोरे जावे लागणार आहे. तसेच पालिकेच्या पैशाची उधळपट्टी होणार आहे त्यामुळे या कामाची चौकशी करून ठेकेदाराचे बिल थांबवून ठेवण्यात यावे अशी मागणी म्हात्रे यांनी केलीय.
————