गरीबाच्यावाड्यात अग्निशमन दलाच्या जागेत चरस, गांजा आणि दारूच्या पार्ट्या : पालिका आणि पोलिसांचे दुर्लक्ष
स्थानिक नागरिकांनी मांडली सिटीझन जर्नलिस्टकडे तक्रार
डोंबिवली : पश्चिमेतील गरीबाचावाडा येथील श्रीधर म्हात्रे चौका शेजारी अग्निशमन केंद्र उभारण्यात आलंय. मात्र ही एक मजली इमारत ओसाड अवस्थेत पडली आहे. सद्या ही जागा चरस, गांजा ओढणे तसेच दारूच्या पार्ट्या यांचा अड्डा बनलाय. या वाढत्या प्रकारामुळे इथले स्थानिक नागरिक हैराण झालेत. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा विष्णुनगर पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून कळवले. मात्र पोलिस त्यांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने स्थानिक नागरिकही कंटाळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी ही समस्या सिटीझन जर्नलिस्टकडे मांडलीय. त्यामुळे इथला गैरप्रकार थांबविण्यासाठी विष्णुनगर पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
गरीबाचावाडयात अनेक आरक्षण धूळखात
गरीबाच्यावाड्यात अग्निशमन दल, रुग्णालय, सभागृह, शाळा अशी अनेक आरक्षण धूळ खात पडलीय. संबंधित विकासकांनी बांधून तशीच पडून आहेत मात्र महापालिकेने ती ताब्यात घेतलेली नाहीत त्यामुळे त्याचा वापर स्थानिक रहिवासी व्यक्तिक कामासाठी तसेच स्थानिक गावगुंड अनैतिक कामासाठी करीत आहेत. त्यातील अनेक आरक्षण मधील दरवाजे, खिडक्यांची तोडफोड करण्यात आलीय.
पालिकेने ही आरक्षणे ताब्यात घेतल्यास अथवा इतर सामाजिक संस्थांना चालविण्यासाठी दिल्यास त्यातून पालिकेला उत्पन्न मिळू शकते. मात्र पालिका आधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची तशी मानसिकता दिसून येत नाही. त्यामुळे आता तरी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग येईल का ? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
**
या ईमारती समोरच परिसराला पाणिपुरठा करणारी पाण्याची टाकी आहे. ही टाकी गेली कित्येक वर्षे लिकेज आहे .रोज हजारो लिटर पाणी वाया जात असते.
याकडेही लक्ष वेधा…