डोंबिवली पश्चिमेकडील पादचारी पुलावरील दिवे अखेर सुरू : सिटीझन जर्नलिस्टने मांडली हेाती समस्या
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील पादचारी पुलावरील दिवे सुरू झाल्याने अखेर आजपासून पुलावरील अंधार नाहीसा झालाय त्यामुळे डोंबिवलीकरांनी समाधान मानलं आहे. डोंबिवली पश्चिमेच्या बाजूकडील रेल्वे स्थानकालगत असलेल्या रेल्वे पादचारी पुलावरील लाईट नेहमीच बंद असल्याने रात्रीच्यावेळी प्रवाशांना अंधारातूनच पुलावरून ये जा करावी लागत होती. डोंबिवलीतील जागरूक नागरिक महेश काळे यांनी ही समस्या फोटोसह सिटीझन जर्नलिस्टकडे मांडली होती. सिटीझन जर्नलिस्टने ही बातमी व्हायरल केल्यानंतर अखेर डोंबिवलीकरांनी याविषयी तीव्र संताप व्यक्त केला होता. याचवेळी शिवसेनेचे नगरसेवक दिपेेेश म्हात्रे यांनी ही समस्या सोडविण्यासाठी त्वरीत लक्ष घालण्यात येईल असे आश्वासन दिले होते. अखेर म्हात्रे यांनी लक्ष घातल्याने ही समस्या सुटण्यास मदत झालीय . डोंबिवली पश्चिमेकडील पादचारी पुलावरील दोन लाईटस तातडीने सुरू केल्या आहेत. उर्वरित लाईटसही त्वरीत सुरू करण्यात यावे अशी मागणी डोबिवलीकरांमधून होत आहे. पादचारी पुलावरील अंधाराची समस्या मांडून ती तातडीने सुटल्याबद्दल डोंबिवलीकरांनी सिटीझन जर्नलिस्टचेही आभार मानले.
कल्याण शील फाटा रोड पर कल्याण फाटा (दत्त मंदिर) से टाटा पावर तक एक भी स्ट्रीट लाइट नही जलती इस रोड पर शाम से देर रात तक नाइट बार और देह व्यापार का गंदा खेल चलता है। प्रशासन की मिलीभगत से सब अंजाम दिया जाता है। मैं इसका विरोध करता हूँ।