नवी मुंबईनंतर आता डोंबिवलीत पोलिसाला माराहण

कल्याण : नवी मुंबईत एका तरूणाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असतानाच आता डोंबिवलीतही एका टेम्पो चालकाने मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. रविकांत पाटील असे त्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. टेम्पो भरधाव वेगात चालविल्याने त्याचा दंड आकारल्याच्या कारणावरून टेम्पो चालक शिवकुमार उर्फ शिवसागर प्रजापती याने त्यांना मारहाण केली त्याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
डोंबिवली वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस हवलदार रविकांत पाटील हे रविवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमरास कल्याण शीळ रोड दावडी नाका येथे डयुटीवर असताना शिवकुमार उर्फ शिवसागर वंशराज प्रजापती हा टेम्पो चालक कल्याण शिळ रोडवर भरधाव वेगाने जात असल्याने पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी टेम्पो चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण प्रजापती याने टेम्पो न थांबवता पुढे नेल्याने पाटील यांनी प्रजापतीचा पाठलाग करत त्याला गाठले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरण्यास सांगितले . मात्र प्रजापती याने नकार देत पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *