कॅश व्हॅन लुटणाच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक : तिघेजण फरार
डोंबिवली :- बॅंकेची कॅश व्हॅन आणि बॅंकेजवळील वृद्धांना लुटण्याचा तयारीत असलेल्या ५ जणांच्या टोळीतील दोन जणांना टिळकनगर पोलिसांनी सापळा रचुन जेरबंद करण्यात यश मिळवले .मात्र तिघे पळून जाण्यास यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक आरोपींना कल्याण न्यायालय हजर केले असता न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
राजू सुंदरराव उफतोल्ला ( ३७ , रा. आंद्रप्रदेश ) आणि बालान्ना दानैया ( ३७ , रा. कर्नाटक ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून स्क्रू ड्रायव्हर, चॉपर अन्य शस्त्रे आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील मनापाडा रोडवरील अभ्युदय बँकाना रोकड पुरवणा-या कॅश व्हॅनवर दरोडा टाकण्याच्या तयारीत हि टोळी आली होती. मात्र गुप्त बातमीदारामार्फत टिळकनगर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिवाजी धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक महेश जाधव यांच्या पथकाने सापळा रचून टोळीतील दोघांना अटक केली . मात्र आंध्रप्रदेश येथे राहणारे चिन्ना बोरचू, विजय अकुला, मिकायल हे तिघे जण पळून जाण्यास यशस्वी झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. .या टोळीने अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे, नवीमुंबई, खारघर, रायगड आदी ठिकाणी चैनस्रॅचिंगसह अन्य घरफोड्या व लूट केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
————

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!