घरफोडी करणारे दोघे अटकेत : 5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

डोंबिवली : सोन्याची चेन आणि मंगळसूत्र हिसकावून पळणा-या चेन स्नॅचिंग टोळीला मानपाडा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. भेाला मिसरीलाल जैस्वाल वय ३२ , कुलदीप यादव वय ३२ अशी अटक करण्यात आलेल्या चोरटयांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र सोन्याची चेन सोन्याच्या बांगडया व कणफुले कॅमेरा व रोख असा एकूण ३० तोळयाचे सोन्याचे दागिने व २६ हजार ५०० रूपये असा एकूण ५ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलय.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी व घरफोडीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढले होते त्याला आळा घालण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले होते. गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोरटयांना अटक करण्यात आली आहे. एकजण चोरी करण्यासाठी गेला असता दुसरा इमारतीखाली पहारा देत उभा असायचा. दोघेही एकमेकांशी मोबाईलवर संपर्क साधायचे त्याचे आतापर्यंत ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोघांच्याही मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलयं. कल्याण पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले पोलीस उपनिरीक्षक विजय मोरे पो हवा मधुकर पाटील सुशिलकुमार हांउे विलास पाटील विजय कोळी निलेश पाटील दिनकर मुकणे संदीप बर्वे किरण सोनावणे यांच्या पथकाने केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!