लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार : सोशल मीडियावर बदनामी करण्याची दिली धमकी
कल्याण : एका तरुणीशी मैत्री करत लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करून तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे .
पीडित तरुणी डोंबिवली पूर्व परिसरात राहते . मुंबई येथे राहणाऱ्या मिलिंद पिंगळे या तरुणाशी तिची मैत्री होती. कालांतराने लग्नाचे आमिष दाखवून मिलिंदने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिला एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलीस स्थानकात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसात तक्रार करशील तर सोशल मिडीयावर तुझे फोटो टाकून बदनामी करेन अशी धमकी त्या तरूणीला दिली होती. अखेर त्या तरूणीने डोंबिवली पेालीस ठाण्यात धाव घेऊन मिलींद पिंगळे या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करीत आहेत.
Vry nyc citizen journalist news..