डोंबिवली : पूर्वेतील आयरे रोड येथील बाळाराम केणे चाळीवर रात्री 11.40 च्या दरम्यान एक मोठे झाड कोसळले. या मध्ये 2 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. अग्निशमक दलाचे कर्मचारी सकाळी 7 वाजल्यापासून झाडाच्या फ़ांद्या कापून काढत आहेत.
आयरे रोड येथील अंबर सोसायटी समोर ही चाळ असून, चाळीच्या शेजारी हे जुने मोठे झाड होते. गेल्या दिवस पाऊस पडत आहे. रात्रीच्या सुमारास अचानक झाड कोसळल्याने रहिवाशी भयभीत झाले. कौलारू घरे असल्याने घरातील वासे, रिपा व कौलांची पडझडं झाली आहे. त्यामुळे रहिवाशांना रात्र जागून काढावी लागली.प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी रहिवासी करीत आहेत.
*****


