डोंबिवली पून्हा हादरली… अॅल्युफिन कंपनीत स्फोट : एक कामगार जखमी : प्रकृती चिंताजनक
डोंबिवली (आकाश गायकवाड) : पूर्वेतील एमआयडीसीतील फेज-2 मधील अॅल्युफिन नामक कंपनीत कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन त्या स्फोटात राजू जावळे (49,रा. सागाव) हा कामगार गंभीर जखमी झालाय. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने एमआयडीसी परिसर हादरून गेला. यापूर्वीही एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये स्फोट होऊन अनेक कामगारांना जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकावर निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
एमआयडीसी फेज देान मधील प्लॉट नंबर 153 मध्ये अॅल्युफिन ही कंपनी आहे. सन १९७८ सालची ही कंपनी आहे. निलेय अजित घोळकर हे या कंपनीचे मालक असून या कंपनीत अल्युमिनियमला कोटींग केले जाते. कंपनीत सकाळच्या सत्रात 4 कामगार काम करीत होते. राजू हे प्लॅन्टच्या पुढच्या बाजूस काम करीत होते तर अन्य तिघे जण मागील बाजूस काम करीत होते. राजू हे व्हॉल बंद करण्यासाठी गेले असतानाच कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. या स्फोटात राजू हे गंभीर जखमी होवून त्यांच्या डाव्याला जबर दुखापत झाली होती. मात्र त्याला तातडीने एम्स रूग्णालयात दाखल करण्यात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुरूवातील कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाल्याची चर्चा पसरली होती मात्र कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याची माहिती सांगण्यात आलीय. या घटनेची माहिती समजताच मानपाड़ा पोलिस व डोंबिवली अग्निशमन दलाचे सुरेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा स्फोट कशामुळे झाला याचा तपास सुरू असल्याचे पेालिसांनी सांगितले. राजेंद्र मृत झाल्याची माहितीपोलिसांकडून देण्यात आली होती मात्र दुपारनंतर तहसीलदारांनी त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याचे ऑपरेशन सुरू असल्याची माहिती कळवली होती. राजेंद्रची प्रकृती चिंताजनक असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलय.
रस्त्यावरचे दोनजणही जखमी
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अॅल्यू-फीन कंपनीतील कॉम्प्रेसरच्या स्फोटात कंपनीतील एक कामगार राजेंद्र जावळे जखमी झाला असतानाच रस्त्यावरुन जाणारे दोन जणही किरकोळ जखमी झाले आहेत. राजेंद्र जावळे (वय 49) रा. सागाव हा कामगार गंभीररित्या जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला एम्स रूग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तसेच हुसेन मुजावर (वय 21) रा. आजदे, सतीश पाटील (वय 36) रा. मानपाडा हे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. हा स्फोट झाला त्याचवेळी हे दोघे मोटरसायकलने घरी निघालेले होते त्याचवेळी ते जखमी झाले. त्याच्यावर उपचार करून सोडण्यात आले.