डोंबिवली खड्ड्यात : अधिकाऱ्यांना रस्त्यात उभे करून मनसेने विचारला जाब
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील खड्डेमय रस्त्याच्या दुरूस्ती वरून महापालिका व एमआयडीसी अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी सुरू असल्याने मनसेने पालिका आणि एमआयडीसी च्या अधिकाऱ्यांना रस्त्यात उभे करून जाब विचारला.
डोंबिवली एमआयडीसी विभागातील रस्त्याची अवस्था खूपच बिकट आहे. रस्त्याची दुरुस्ती न करता खोदकाम सुरू असल्याने बुधवारी रात्रीच मनसे रस्त्यावर उतरली होती.
डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी रिलायन्स चे अनधिकृत खोदकाम बंद केले होते. मात्र त्यानंतर आज दुपारी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, मनसे विद्यार्थी सेनेचे सागर जेथे यांनी पालिका आणि एमआयडीसी च्या अधिकाऱ्यांना खड्डये असलेल्या रस्त्यावर उभे करून रस्त्याविषयी जाब विचारला. यासंदर्भात ५ मे ला होणार संयुक्तिक बैठक, रस्त्यांची जबाबदारी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र तोपर्यंत रस्त्यावर एक ही खड्डा खणायचा नाही अशी तंबी मनसेने अधिकाऱ्यांना दिली.
पहा व्हिडीओ