डोंबिवली : डोंबिवली पत्रकार संघाची सन २०२१-२२ ची नवीन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी संतोष गायकवाड, उपाध्यक्षपदी महावीर बडाला, सचिवपदी श्रीराम कांदू तर खजिनदारपदी वासुदेवन मेनन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कल्याण डोंबिवली शहरातील एक प्रतिष्ठीत व सर्वात जुना पत्रकार संघ म्हणून डोंबिवली पत्रकार संघाची ओळख आहे. पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा लिजंट हॉटेलमध्ये संपन्न झाली. सभेच्या प्रथा व परंपरेनुसार मावळते अध्यक्ष शंकर जाधव आणि त्यांच्या कमिटीने नवीन अध्यक्षांचे नाव जाहिर केले. सभेच्या सुरूवातीला पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य कै. विकास काटदरे आणि जेष्ठ सदस्य कै. महेंद्रभाई ठक्कर यांना भावपूर्ण आंदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मावळत्या कमिटीने कामाचा लेखाजेाखा आणि इतर सुचना मांडल्या. नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी सांगितले की, संघातर्फे विविध विषयावर मान्यवरांचे वार्तालाप घेऊन शहरातील पायाभूत सुविधा आणि समस्यांचे निराकारण कसे होईल याकडे लक्ष वेधण्यात येईल, तसेच पत्रकारांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी संघाच्यावतीने पुढाकार घेण्यात येईल असेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं. सर्व उपस्थित सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र थोरावडे, बापू वैद्य, बजरंग वाळूंज, प्रशांत जोशी, आकाश गायकवाड, प्रशांत गोरे, सुरेश गायकवाड, अंकिता केळक़र, सोनल सावंत आदी सदस्य उपस्थित होते.
————-