डोंबिवली/ प्रतिनिधी: डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरातील एका रेशन दुकानतून धान्य वाटप योग्यप्रकारे होत नसल्याचा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांनी दुकानात धडक देत, रेशन दुकान चालविणाऱ्या महिलेला धारेवर धरीत जाब विचारला.
रेशनिंग दुकानदारांनी दहा तारखेच्या आत गोडाऊनमधून धान्य उचलून पुढच्या सहा दिवसांमध्ये लोकांपर्यंत ते धान्य पोहोचायला हवं, असा नियम मोदी सरकार आल्यापासून लागू झाला आहे”, “तुमच्याकडे धान्य नाही. ही चूक लोकांची नाही. असं चव्हाण यांनी सांगितलं.