नवी दिल्ली  : बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी १२ तास होऊनही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. हजारो नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन करीत दिवसभर रेल्वे रोखून धरल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाल्यानंतर अखेर प्रशासनाकडून प्रशासनाने गुन्हा  दाखल केला.  या  घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले असून निषेध आंदोलने होत आहेत. या घटनेवरून  लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत तीव्र नाराजी व्यक्त केलीय.  आता काय साधा FIR दाखल करण्यासाठीसुद्धा आंदोलने करावी लागणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय 

काय म्हणाले राहुल गांधी 

पश्चिम बंगाल, युपी, बिहार यांच्या नंतर महाराष्ट्रात घडणारे घृणास्पद कृत्य हे विचार करण्यास प्रवृत्त करतात की आपण एक समाज म्हणून कोणत्या पातळ्या गाठत आहोत? बदलापुरात झालेल्या या निर्दयी कृत्याबद्धल पहिली पायरी तोपर्यंत उचलली गेली नाही जोपर्यंत बदलापूरवासीय तसेच सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले , लोकल गाड्या अडवल्या नाही तोपर्यंत या प्रकरणाची कोणीही दखल घेतली नाही. या झालेल्या प्रकाराबद्धल साधा FIR दाखल करण्यासाठी पीडितांच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशन्स पालथी घालावी लागली, तरीही तब्बल १२ तास या कुटुंबियांना वणवण फिरावे लागले. आता काय साधा FIR दाखल करण्यासाठीसुद्धा आंदोलने करावी लागणार का ? पीडितांच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनला जाणं सुद्धा कठीण होऊन बसलं आहे का? न्याय देण्यापेक्षा जास्त झालेला गुन्हा लपवण्यासाठीच जास्तीत जास्त प्रयत्न केले जात आहेत.

या सर्व घटनांमध्ये शिकार म्हणून केवळ महिला आणि कमजोर वर्गच भक्ष्यस्थानी सापडला जात आहे. FIR दाखल न होणे म्हणजे केवळ पीडितांना हतबल कारण तर आहेच, त्याशिवाय जे नराधम आहेत त्यांना प्रोत्साहित करण्यासारखं आहे. या सर्वांवर उपाय म्हणून सर्व पक्षांनी एकत्र येऊन महिलांसाठी योग्य आणि सुरक्षित असे वातावरण मिळावं या दृष्टीने प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे. या संपूर्ण घडणाऱ्या कृतींना गंभीरतेने घेणे महत्वाचे आहे. न्याय हा सर्वांचा संविधानिक अधिकारासोबतच हक्कच आहे. हा न्याय पोलीस आणि प्रशासन यंत्रणांच्या हातातील खेळणे नाही. घडल्याप्रकारावर लवकरात लवकर कारवाई होणे गरजेचे आहे.” 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *