कल्याण/ प्रतिनिधी :  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह कल्याण डोंबिवलीत देखील संपूर्ण लॉकडाऊन घेण्यात आला आहे. मार्चपासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे आता आमची सहनशीलता संपली असून, 19 जुलैनंतर लॉकडाऊन वाढवू नका अशी मागणी डोंबिवली ग्रेनअँड  प्रॉव्हिजन मर्चंटस असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्र्यासह पालकमंत्री जिल्हाधिकारी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे

जून मध्ये अनलॉक सूरु करून व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता, पण आता पुन्हा जुलै महिन्यात 2 तारखेपासून 12 जुलै पर्यन्त  कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊन घेण्यात आला, 12 जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन 19 जुलै पर्यन्त  वाढवण्यात आला. लोकडाऊनमुळे आर्थिक अडचणी वाढल्या असून आता लॉक डाऊन करू नका अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.  गेली चार महिने आम्ही शासनाच्या सूचनांचे पालन करत शासनाला सहकार्य केले, मात्र पुन्हा लोकडाऊन घेतल्यास आमची सहनशिलता संपली आहे ,इथून पुढे  आम्हाला सहकार्य करणे अवघड होईल त्यामुळे 19 जुलै नंतर लॉकडाऊन वाढवू नये अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. https://www.facebook.com/305508959930660/posts/939466263201590/


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *