कुप्रसिध्द गँगस्टर डी. के. रावला बेडया ठोकल्या
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई : मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी मुंबईचा कुप्रसिध्द गँगस्टर डी के राव याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेडया ठेाकल्या.
वर्षभरपूर्वीच डी के राव हा जेलमधून सुटून आला होता. मात्र त्यानंतरही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाकडून ५० लाखाची मागणी डी के रावने याने मागितली होती. मुंबई पोलिसांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे मुंबई पोलीस हे त्याच्यावर पाळत ठेवून होते. अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने डी के च्या मुसक्या आवळल्यात यश मिळवले. ही कारवाई पोली उपायुक्त दिलीप सावंत, एसीपी पद्माकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनय घोरपडे, पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख, सहाययक पेालीस निरीक्षक विक्रम चव्हाण, विजय ढमाळ, जगदीश राऊत यांच्या पथकाने केली. काही दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक केली होती आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने डी. के. रावला अटक केली आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगताला हादरा बसला आहे.
कोण आहे, डी.के. राव
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक म्हणूनच डी. के. राव ओळखला जातो. डी. के. रावचं मूळ नाव रवी मल्लेश वोरा आहे. काही वर्षांपूर्वी इन्स्पेक्टर मदुला लाड यांच्यासोबतच्या चकमकीत डी. के. राव जखमी झाला होता. त्यावेळी त्याच्या खिशात बँकेचं बनावट आयकार्ड मिळालं होतं. त्यावरील नाव डी. के. राव असे होते. तेव्हापासून तो डी. के. राव या नावानेच अंडरवर्ल्डमध्ये त्याची ओळख आहे. डी के चा अधिकाधिक कालावधी हा तुरूंगात गेला आहे.
फोटो- सुरेश ढेरे