दिव्यांगच्या डब्ब्यातून प्रवास करून नका, सांताक्लॉजची जनजागृती
घाटकोपर (निलेश मोरे) : रेल्वे प्रशासनाकडून अनेकदा दिव्यांगच्या डब्ब्यातून प्रवास करु नये यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात येते. विविध संकल्पनेतून प्रवाशाना जागृत करण्यासाठी घाटकोपर आरपीएफ पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येते यावेळेला थेट सांताक्लॉजच्या माध्यमातून पोलिसांनी जनजागृती मोहीम राबवली. सांताक्लॉजने दिव्यांगच्या डब्ब्यातून प्रवास करू नका असा संदेश इतर प्रवाश्यांना दिला.
दिव्यांगच्या डब्ब्यातून प्रवास करू नका असे रेल्वे प्रवाशांकडून वारंवार आवाहन केले जाते मात्र त्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून रोज अन्य प्रवाशी दिव्यांग डब्ब्यातून प्रवास करीत असतात. सांताक्लाज च्या माध्यमातून घाटकोपर , विक्रोळी , कांजूरमार्ग , भांडुप स्थानका पर्यंत हि मोहीम राबविण्यात आली . सांताक्लॉज काही दिवसांवर आला असून, घाटकोपर आरपीएफ निरीक्षक छेदी लाल कनोजिया यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या मोहिमेत निरीक्षक ब्रिजेश कुमार , किशोर पाटील आदी अधिकारी उपस्थित होते .