दिवा : मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा मात्र अतिशय तोकड्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना तातडीने सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे अधिका-यांकडे केलीय यावेळी मनसे रेल्वे सेन अध्यक्ष जितेंद्र पाटील, तुषार पाटील सोबत उपस्तिथ होते याबाबतचे एडीआरएम ऍडमिन डॉ सुमन देउळकर, सिनियर डीसीएम गौरव झा, सिनियर डीइएन एस के गर्ग यांना निवेदन देण्यात आले.
दिवा रेल्वे स्थानकातून दिवसाला १० हजारांपेक्षा जास्त तिकीट विक्री होते. तिकीटघर पश्चिमेला असून यावर प्रवाशांची मोठी रांग लागते. त्यामुळे प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागते. दिवा परिसरात ८० टक्के लोकसंख्या पूर्वेला राहते त्यामुळे त्यांना पश्चिमेला येऊन तिकीट घ्यावे लागते रेाजच्या त्रासाला प्रवासी कंटाळले आहेत. त्यामुळे दिवा पूर्वेला त्वरित तिकीट खिडकी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलीय. तसेच दिवा स्थानकातील केवळ प्लॅटफॉम क्रमांक १ वर शौचालय आहे. तरी दिवा पूर्वेला जागा उपलब्ध करून शौचालय बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी.