पालघर / प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांच्या विविध प्रश्नासाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीतर्फे पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरसाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यातील मच्छीमारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिली.
जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी मत्स्य विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत ८०% स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य देणे, एमआयडीसी मधील कंपन्यांचे रासायनिक पाणी समुद्रात वा खाडीत न सोडणे अश्या अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
याप्रसंगी, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष दामोदर तांडेल, कार्याध्यक्ष बनार्ड डिमेलो, सरचिटणीस संजय कोळी,
पालघर जिल्हा अध्यक्ष विनोद पाटील, पालघर जिल्हा महिला अध्यक्षा शुभांगी राजेश कुटे, सरचिटणीस कुंदन दवने, उपाध्यक्ष संतोष मर्दे, उमेश पालेकर, नंदकुमार विन्दे, महिला कार्याध्यक्षा प्रज्ञा तरे, युवा अध्यक्ष भावेश तमोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*****ध