रनर्स लॅन फाऊंडेशन, डोंबिवली आणि रिलायन्स रियालिटी लिमीटेड यांचा उपक्रम
शहापूर : रनर्स लॅन फाऊंडेशन, डोंबिवली आणि रिलायन्स रियालिटी लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि २०-०७-२०२४ रोजी शहापूर तालुक्यातील तीन शाळेतील मुलांना CSR फंडातून शालेय वस्तुं आणि खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
ठाणे जिल्हा, शहापूर तालुका येथील अतिशय दुर्गम ठिकाणी वाशाळा गावापासून सुमारे १२ ते १५ कि.मी. अंतरावर जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या तीन शाळा आहेत. या तिन्ही शाळा आतिषय दुर्गम आणि आदिवासी विभागात आहेत. त्यामुळे याठिकाणी कोणत्याही शासकिय योजना पोहचत नाहीत. अशा शाळांचा आमच्या संस्थेने शोध घेतला आणि तेथील मुलांना एक लहानशी मदत करण्याचे ठरविले.
त्यापैकी प्रथम थराचापाडा या शाळेला भेट देवून त्या शाळेतील एकूण २५ विद्यार्थ्यांना त्या शाळेचे शिक्षक . बाबाजी थापड यांच्या मदतीने १. चांगल्या दर्जाची स्कूल बॅग, ६ शंभर पानी वाह्या, ६ दोनशे पानी वह्या, ६ लाँगबुक, कंपास बॉक्स, एक पेन्सील- रबर सेट आणि मुलांना आणि मुलींना खेळ्यासाठी दोन वेग वेगळे फुटबॉल आणि स्किपींग रोप इत्यादी वस्तुंचे वाटप केले.
तेथून १० कि.मी. अंतरावर असलेल्या पाटोळपाडा येथील शाळेला आम्ही भेट देवून शाळेतील ६५ मुलामुलींना मुख्याध्यापक लोंढे सरांच्या मदतीने शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले.
तिथून ८ ते १० कि. मी. अंतरावर असणारी टोकरखांड येथील शाळेला भेट देवून शाळेच्या शिक्षिका सौ. सावंत यांच्या मदतीने ६२ मुला- मुलींना वरीलप्रमाणे शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम तेथील ग्रामस्थ, शिक्षक वर्ग, रनर्स क्लॅन फाऊंडेशनचे सर्व सदस्य आणि रिलायन्स रियालिटी प्रतिनिधी श्री. मोहन पाटील आणि स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडला.
या उपक्रमाला वनविभाग अधिकारी विशाल गोधडे ( RFO) आणि त्यांचे सहकारी तसेच वाशिंद शहराचे विभाग प्रमुख . संदिप पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.