ठाणे प्रतिनिधी : राष्ट्रीय काँग्रेस पार्टी ठाणे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर तालुका काँग्रेस कमिटी व डी वाय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन माध्यमिक विद्यालय,चांग्याचापाडा मधील सर्व विद्यार्थ्यांना राईटींग पॕड व कंपासचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा.देवेंद्र भेरे सर,कार्याध्यक्ष जयकुमार करण,काँग्रेस आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष.दत्तात्रय बरोरा जिल्हा उपाध्यक्ष जयदीप देशमुख, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष अकबर शेख,तालुका उपाध्यक्ष अन्वरभाई शेख,तालुका चिटणीस बबन विशे,मोंडूळा सर,साबळे सर,हरिश्चंद्र विशे,रवी विशे,हमीद शेख,,विनायक पडवळ आदी उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत स्कूल कमीटी सदस्य भास्कर विशे,रविंद्र चौधरी,,दिनेश हरणे यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक मधुकर हरणे सर यांनी,सूत्रसंचलन प्रदीप शिंदे सर यांनी तर आभार राजेंद्र सापळे सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी.ए.शिंदे सर,पुनम चौधरी मॕडम व गोखले सर यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *