सिव्हिल रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक धनंजय पारखे सेवानिवृत्त
ठाणे : सिव्हिल रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) धनंजय पारखे हे ३३ वर्षाच्या सेवेनंतर ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले. रुग्णालयाच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये सेवनिवृत्तीचा सोहळा पार पडला. यावेळी सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार आदी उपस्थित होते.
रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात समाजसेवा विभाग असतो. हे समाजसेवा विभाग रुग्णांना रोगविषयी व उपचारविषयी तसेच खर्चाविषयी मार्गदर्शन करीत असते. याच समाजसेवा विभागात धंनजय पारखे हे १९८५ पासून काम करीत आहेत. रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांना मोठमोठ्या रोगावर उपचार करण्यासाठी लागणार खर्च सामाजिक संस्थेकडून मिळवून देण्यात पारखे यांचा खूप मोलाचा वाटा असे त्यामुळे रुग्णांशी त्याचे वेगळं नात जडलं होत. १९८१ पारखे यांनी समाज सेवेची पदवी मिळवली. १९८५ साली केईएम रुग्णालयात सेवा बजावली. लंडनच्या प्रोजेक्ट्वर त्यांनी काम केलं. २००७-२०१६ पर्यंत त्यांनी उल्हासनगर सेंट्रल रुग्णालय त्यानंतर ३०१८ पर्यंत ठाणे सिव्हिल रुग्णालयात सेवा बजावली. त्यांच्या ३३ वर्षाच्या कारकिर्दीत पारखे याना समाजभूषण आणि अपंग सेवा पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षाकडून त्यांना गौरवण्यात आलंय. गोरगरिबांच्या सेवा करणे हा माझा श्वास आहे त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी जितके काम करत येईल तितके काम करणार असे धनंजय पारखे यांनी सांगितलं.
————