राहुल गांधींच्या अध्यक्षपदा विरोधात देवदासी महिलांचे मुंडन आंदोलन आणि पोलिसांचा हस्तक्षेप 

घाटकोपर ( निलेश मोरे ) : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी  राहुल गांधी यांची आज सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आल्याच्या निषेधार्थ  घाटकोपर मध्ये महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनेने मुंडन आंदोलन करून निषेध केला . मात्र मुंडन करीत असतानाच पोलिसांनी  हस्तक्षेप करीत  महिलांना ताब्यात घेतले.
संघटनेचे अध्यक्ष विलास रुपवते यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्षा आशाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर पूर्वेला नीलयोग मॉल समोर संघटनेच्या महिलांनी  मुंडन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला . मात्र पंतनगर पोलिसांनी आंदोलन दडपत महिलांना ताब्यात घेतले . आंदोलनकर्त्या आशाताई पवार म्हणाल्या की,   राहुल गांधी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदी असताना त्यांनी महाराष्ट्रातील एकाही निराधार , विधवा , देवदासी महिलांना न्याय दिलेला नाही . काँग्रेस पक्षाकडून नेहमीच निराधार महिलांना तुच्छ वागणूक मिळाली आहे . राहुल गांधी अध्यक्ष होणे हि फक्त घराणेशाहीची वाटचाल आहे . काँग्रेस लोकशाही नाही तर घराणेशाहीच्या मार्गाने चालत आहे आणि त्याचा आज आम्ही निषेध करतो . भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस असताना लाखो अनुयायी दुःख व्यक्त करता असताना एकीकडे राहुल गांधीना अध्यक्ष करत 6 डिसेंबरंला फटाके वाजवणार म्हणजे काँग्रेस पक्ष जातीपातीचे राजकारण करणारा पक्ष आहे हे सिद्ध होते असेही आशाताई पवार म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *