Desert Wheatear, a rare bird in South Africa, was found in Bhopar village of Dombivli

डोंबिवली दि.1 मार्च : डोंबिवलीच्या भोपर गावात दक्षिण आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा (Desert Wheatear) हा पक्षी आढळून आला आहे. मार्च महिन्यात हा पक्षी भारतात येतो. तब्बल पाच हजार किमी अंतर ओलांडून हा पाहुणा डोंबिवलीत आला आहे. पक्षी निरीक्षक आणि आहार तज्ञ डॉ. महेश पाटील यांनी या देखण्या पक्षाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

भोपर गावात निसर्गसंपन्नत आहे त्यामुळे या ठिकाणी विविध पक्षांची ये जा असते त्यामुळे पक्षी निरीक्षक याठिकाणी येत असतात. डॉ. महेश पाटील हे भोपर गावात गेले असतानाच त्यांना गावात दक्षिण आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा पक्षी आढळून आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावात या पक्षाला आपल्या कॅमे-यात कैद केले.

अतिशय चपळ असणाऱ्या या रणगोजा (Desert Wheatear) पक्षाचे दक्षिण आफ्रिकेचे (south africa) सुप्रसिद्ध सहारा वाळवंट (sahara Desert) मूळ निवासस्थान आहे. या ठिकाणाहून हा रणगोजा (Desert Wheatear) पक्षी तब्बल ५ हजार किलोमीटरचे अंतर कापून डोंबिवलीमध्ये आलाय. विशेष म्हणजे त्याचा आकार आणि रंग हा आपल्याकडील चिमणीप्रमाणेच आहे. दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसांत हा चिमुकला मात्र तितकाच कणखर पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापून भारतात दाखल होत असतात. साधारणपणे मार्च अखेरीपर्यंत रणगोजा हा पक्षी आपल्याकडे मुक्कामी येत असतो. त्यानंतर हा इवलासा पक्षी आपल्या मूळ गावी परततो अशी माहिती पक्षी निरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!