डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील वाहतूक केांडी दखल घेत पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी वाहतूक अधिकारी आणि पालिका अधिका-यांना काही सूचना केल्या. वाहतूक कोंडीतून लवकर मार्ग काढू व वाहनचालक प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल असे आश्वासन उपायुक्त शिरसाट यांनी दिले. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक आढाव आणि रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डोंबिवली पश्चिमेतील मॉन्जिनीस चौक, कोल्हापूर चौक, गोपी टॉकीज चौक या ठिकाणी दररोज वाहतूक केांडी होत असल्याने वाहनचालक व प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना सूचना केल्या. चार दिशा मार्ग असलेल्या चौकांमध्ये एक दिशा मार्ग करण्याबाबत रिक्षा संघटनांशी सल्लामसलत करण्यास सांगितले. P1,P2 फलक लावण्यास सांगितले. यावेळी महानगरपालिका ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सामंत उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करून फेरीवाल्यांपासून रस्ता मुक्त करावा अशी सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी रिक्षाचालक संघटनेचे राजा चव्हाण, भगवान मोरजकर, संदीप उर्फ पप्पू पाटील,दिगंबर लिंगायत, विजय गावकर व रिक्षा युनियनचे शेखर जोशी हे यावेळी उपस्थित होते. यावेळी रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी उपायुक्तांना काही समस्या व सूचना मांडल्या.