डोंबिवली : पोलिस वर्धापन सप्ताहानिमित्त पोलिस, इंडियन डेंटल असोसिएशन आणि ईगल ब्रिगेड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विष्णूनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खांदारे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन डेंटल असोशिएशनच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष डॉ. सौरभ दणाईत, डॉ. कल्पना दबक, डॉ. कल्पना यादव डॉ. संहिता दबक, डॉ. नितीन जोशी, डॉ. अंकिता पासद, डॉ. राजीव वाणी यांच्यासह ईगल ब्रिगेड फाऊंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांच्या संकल्पनेतून हे शिबिर पार पडले. या शिबिरात जवळपास  50 पोलिसांची दंत चिकित्सा केल्यानंतर पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ईगल ब्रिगेड फाऊंडेशनचे सदस्य पूजा मोरे, योगेश साबळे, संजय गायकवाड यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!